जगभरातील ३८ देशांत प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी'


वृत्तसंस्था / मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट भारतासह जगभरातील एकूण ३८ देशांत प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशाचाही यात समावेश आहे. 
चित्रपटाचे निर्माते व वितरक आनंद पंडित यांनी ही माहिती दिली आहे. 'मोदींच्या जीवनाविषयी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील चित्रपटरसिकांना जाणून घ्यायचं आहे. या चित्रपटाबद्दल देशाबाहेरही बरीच उत्सुकता आहे. त्यामुळंच आम्ही भारतासह इतर ३८ देशांत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलंय,' असं ते म्हणाले. भारतात हा चित्रपट १७०० स्क्रिनवर दिसेल तर भारतााबेहर ६०० स्क्रिनवर झळकवण्याचा आमचा विचार आहे. भारतात हिंदीशिवाय तेलुगू आणि तामीळमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होईल,' असंही त्यांनी सांगितलं. 'या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे,' असंही ते म्हणाले.  उमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्यात पंतप्रधान मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-07


Related Photos