निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / मुंबई :
भारत निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टी - बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
निवडणूक आयोगाबाबत अ‍ॅड.आंबेडकर यांनी काल दिग्रस (जि. यवतमाळ) येथे झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम ५०३ , ५०६ , १८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-05


Related Photos