महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांतर्गत पात्र लाभर्थ्यांनी ई केवायसी करावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी कृषी विभागामार्फत नागपूर जिल्हयात तालुकास्तरावर विशेष मोहीम २० व २१ जून २०२३ रोजी राबविण्यात आली. त्यानंतरही पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार संलग्न करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सद्यस्थितीत तालुकास्तरावर युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणीकरण व बँक आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांना पुढील १४ वा हप्ता वितरीत होणार नाही. तरी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार संलग्न करणे या प्रक्रिया तत्काळ पूर्ण कराव्यात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos