महत्वाच्या बातम्या

 बालासोर दुर्घटनेप्रकरणी सात रेल्वे कर्मचारी बडतर्फ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / ओडिशा : ओडिशा येथील बालासोर ट्रेन दुर्घटनेत सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्य़ांना अटक केली होती. आता रेल्वेने या तीन कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना बडतर्फ केले आहे. गेल्या महिन्यात २ जून रोजी बालासोर येथे ही भीषण दुर्घटना घडली होती. त्यात २९३ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर १ हजार २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

या प्रकरणी दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचे महाप्रबंधक अनिल कुमार मिश्रा यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, जर अधिकारी अधिक जागरुक असते तर हा अपघात टळला असता. रेल्वेने या प्रकरणात सात कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यात ते तीन रेल्वे कर्मचारीही समाविष्ट आहेत, ज्यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणी वरिष्ठ सेक्शन इंजिनियर (सिग्नल) अरुण कुमार महंत, सेक्शन इंजिनियर मोहम्मद आमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पु कुमार यांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण पूर्व विभागाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासात रेल्वे स्टेशनच्या उत्तर सिग्नल यंत्रणेतील सर्किटमध्ये छेडछाड झाल्याने हा अपघात घडला होता. हावडा येथे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस दोन जून रोजी दुसऱ्या मार्गावर उभ्या असणाऱ्या एका मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली. त्याच दरम्यान कोरोमंडलचे काही डबे तिथून जाणार्या बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या शेवटच्या काही डब्ब्यांवर पडले आणि हा भीषण अपघात झाला.





  Print






News - World




Related Photos