महत्वाच्या बातम्या

 वंचित बहुजन आघाडी चे कुशल मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त विंजासन बुद्ध लेणी येथे वृक्षारोपण व पक्ष प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती चे सचिव तथा वंचित बहुजन आघाडी चे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम यांच्या वाढदिवसा निमित्त विंजासन बुद्ध लेणी, भद्रावती परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 

महिला आघाडीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसा निमित्त अन्वर शेख आणि प्रविण मेश्राम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. 

कुशल मेश्राम यांच्या वाढदिवसा निमित्त भद्रावती येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध आघाडी व संस्थेच्या वतीने स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला. यात विंजासन बुद्ध लेणी ट्रस्ट चे अध्यक्ष सुशील देवगडे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती चे अध्यक्ष डाॅ.नगराळे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे बिपिन देवगडे, धम्मचक्र अनुवर्तन सोहळा समिती चे वैभव पाटील व वंचित बहुजन आघाडी चे कपुरदास दुपारे, विशाल कांबळे, संदीप ढेंगळे, नगर सेवक सुनिल खोब्रागडे, नगरसेविका सिमा ढेंगळे, राखी रामटेके यांच्या सह अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थितीत  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो या घोषणा देत वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.





  Print






News - Chandrapur




Related Photos