युवक काँग्रेस व श्री गौरव परिवार तर्फे स्व: खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपुर : प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात कोणतेही नाही. ही भावना लक्ष्यात ठेवून श्री गौरव परिवार चंद्रपूर व बल्लारपुर युवक कांग्रेस तर्फे ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त ४ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन श्री गौरव परिवार, चंद्रपूर व माजी नगरसेवक कुशल पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव चेतन गेडाम यांनी केले होते.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य घनश्याम मूलचंदानी, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, एन.एस.यु.आई जिल्हा अध्यक्ष शफाक शेख, माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, माजी नगर सेविका शोभा महंतो, माजी न.प गट नेता देवेंद्र आर्य, माजी नगरसेवक भास्कर माकोड़े, माजी नगर सेवक विनोद आत्राम, सामाजिक कार्यकर्ता नासिर बक्ष (भुरू भाई), युवक कांग्रेस शहर अध्यक्ष अरविंद वर्मा, दानिश शेख, उपाध्यक्ष अजय रेड्डी, उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, महासचिव अकरम शेख़, सचिव बशीर सिद्दीकी, करण कामटे सोशल मीडिया अध्यक्ष संजय घुग्लोत, संदीप नाक्षिणे, अमोल काकड़े, राजू घुगरे, रोहित खान, गोपाल कलवला,
सचिन कौरासे, आकाश दुर्गे, राहुल रामटेके, शब्बीर शेख, अभिलाष, इमरान शेख, आफताब पठान, सिधु बिमानवार, राजकरण निषाद, सुनील यादव, सुमित शेंडे, सुधिर बेजलवार, शिवम लोनारे यांची उपस्थिती होते.
भविष्यात गरजुंना रक्ताची गरज भासू नये, यासाठी ४९ युवकांनी रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी आदरांजली वाहण्यात आली. तसेच रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिराचे आयोजक श्री गौरव परिवार, चंद्रपूर व बल्लारपुर युवक काँग्रेस सर्वाचे आभार मानले.
News - Chandrapur