नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला, दोन किलोचा बाॅम्ब पोलिसांनी केला नष्ट


 - धानोरा तालुक्यातील हिरंगे पहाडीवरील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / धानोरा :
मुरूमगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षल्यांनी आखलेला घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. हिरंगे नजीक असलेल्या पहाडीवर नक्षल्यांनी पेरून ठेवलेला बाॅम्ब पोलिसांनी नष्ट केला आहे. सदर घटना आज १६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
सिआरपीएफच्या ११३ व्या बटालियनचे जवान व जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना २ किलो वजनाचे बाॅम्ब आढळून आले. बाॅम्ब असल्याचे दिसून येताच गडचिरोली येथील विशेष पथक बोलावून निकामी करण्यात आले. 
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली मोठ्या प्रमाणात घातापाताच्या योजना आखत आहेत. मागील काही दिवसांमध्ये दोन ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दुर्गम भागात, बॅनर, पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात निवडणूक कालावधीत अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. यामुळे नक्षली कारवायांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-16


Related Photos