महत्वाच्या बातम्या

 प्रशासकीय इमारतीसमोरील अनधिकृत केंद्रांवर कारवाई


- महसुल प्रशासनाची कारवाई

- अनधिकृत १६ दुकाने काढली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : येथील प्रशासकीय इमारतीसमोर अनधिकृतपणे महाऑनलाईन व जनसुविधा केंद्र चालविण्यात येत होती. तालुका महसुल प्रशासनाने या अनधिकृत केंद्रांवर आज कारवाई करण्यात आली. हे केंद्र परिसरातून हटविण्यात आली आहे.

तहसिलदार रमेश कोळपे यांच्या निर्देशानुसार नायब तहसिलदार बाळुताई भागवत यांनी ही कारवाई केली यावेळी पोलीस जमादार पुंडलीक वैरागडे व दिनेश अटेल यांचा कारवाईत सहभाग होता. प्रशासकीय इमारतीसमोर रस्त्यावर अनधिकृतपणे अनेकांनी सेवा देणारी दुकाने थाटली होती. यामुळे इमारतीसह येथे येणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

अनधिकृतपणे महाऑनलाईन व जनसुविधा केंद्र चालविणे कारवाईस पात्र आहे. त्यामुळे असे केंद्र चालविल्याचे आढळून आल्यास केंद्र चालकाचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे तहसिलदार रमेश कोळपे यांनी कळविले आहे. नागरिकांनी प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी आपले अर्ज अधिकृत महाऑनलाईन व जनसुविधा केंद्रावरुनच सादर करावे, असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos