महत्वाच्या बातम्या

 पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) येथे कृषी मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : २९ जून २०२३ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) येथे पोलीस अधीक्षक, नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस उपविभाग हेडरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र गट्टा जांबिया येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कृषी मेळाव्यामध्ये पोलीस मदत केंद्र गट्टा हद्दीतील अती दुर्गम भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी अधिकारी चेतन परदेशी होते. त्यांनी उपस्थित नागरिकांना शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेतीचे पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त पीक उत्पन्न घेण्यासाठी आवाहन केले. तसेच फक्त धान पीक न घेता इतर पिकांमधुन ही कसे उत्पन्न वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

पोलिस उपनिरीक्षक मेतलवाड व तिडके यांनी उपस्थित नागरिकांना पोलिस दलमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.

सदर मेळाव्यामध्ये शेतकरी बांधवांना १) ३.५ क्विंटल (मोफत) धान बियाणे वाटप- ३५, २) सीताफळ रोपवाटप २०, ३) बांबूचे रोपवाटप १५, ४)करंजी रोपे वाटप २५, ५) आवळा रोपे वाटप २०, ६)कवठफळ रोप वाटप १०, ७)पेरू फळ वाटप-१० असे एकूण १०० रोप तसेच उपस्थित ३८ महिलांना वांगे, भेंडी, गवार, चवळी, कारले, टोमॅटो, कांदा व इतर भाजीपाला यांचे असे एकूण ३८ पाकीट बीज वाटप करण्यात आले.

तसेच उपस्थित सर्व गावकरी लोकांची प्राथमिक उपचार केंद्र गट्टा येथील नामदेव वासेकर, प्रविन कुनघाडकर, कैलास गोरडवार या कर्मचाऱ्यांकडून मलेरिया तपासणी करण्यात आली. उपस्थित शेतकरी बांधवांना जेवणाची व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करून कृषी मेळाव्याची सांगता करण्यात आली. सदर कृषी मेळावा साठी गट्टा पोलिस मदत केंद्र येथील सर्व अधिकारी व अमलदार यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos