साकोली पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
तक्रारदाराच्या आईच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेला ४५ हजार रुपयांचा दुसरा चेक काढण्याकरिता १ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारणारा साकोली पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे . अमीत रामदेव लाडे (२७ ) असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून त्याच्या विरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
 तक्रारदार हे साकोली जि. भंडारा येथील रहीवासी असुन शेतीचे काम करतो. तक्रारदाराच्या आईच्या नावाने सन २०१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले होते. सदर घरकुलासाठी शासनाकडून एक लाख तीस हजार रूपयाचे अनुदान मंजुर झाले असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम सुरु  करण्याकरिता २० हजार रुपयांचा प्रथम धनादेश तक्रारदाराच्या आईचा स्टेट बॅक आॅफ इंडिया या खात्यावर जमा झाल्याने घरकुलाचे पाया बांधुन पायाचे पुर्ण बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र सचिव यांनी त्यांच्या कार्यालयाचे स्तरावर पंचायत समिती साकोली येथे सादर केले. त्यानंतर उर्वरीत बांधकाम पुर्ण करण्याकरिता दुसरे चेक मिळण्याकरिता तक्रारदार हे पंचायत समिती साकोली जि. भंडारा येथे गेले असता तेथील कार्यरत अमीत रामदेव लाडे, अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती साकोली यांना भेटले. त्यांनी तक्रारदारास त्यांचे आईचे नावाने  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर  असलेला ४५ हजार रुपयांचा  दुसरा धनादेश काढण्याकरिता तक्रारदारास १ हजार रू लाचेची मागणी केली. तक्रारदारास अमीत रामदेव लाडे,
 यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे १४ मार्च रोजी सापळा कार्यवाही आयोजीत केली असता सापळा कार्यवाही दरम्यान अमीत रामदेव लाडे, अभियंता कंत्राटी, पंचायत
समिती साकोली जि. भंडारा यांनी तक्रारदारास तक्रारदाराचे आईच्या नावाने प्रधानमंत्री  आवास योजनेअंतर्गत मंजूर  असलेला ४५ हजार रुपयांचा दुसरा चेक काढण्याकरिता १ हजार  रू लाचेची मागणी करून लाचरक्कम स्विकारली. यावरून आरोपीविरूध्द पो. स्टे. साकोली जि. भंडारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारीत) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . 
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,नागपूर पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, (अतिरिक्त कार्यभार) ,अपर पोलीस अधिक्षक राजेश  दुद्दलवार,  
  यांच्या मार्गदर्शनात  महेश चाटे, पोलीस उपअधीक्षक, योगेष्वर पारधी, पोलीस निरीक्षक, पोशी  अष्विनकुमार गोस्वामी, कोमल बनकर, शेखर देशकर, पराग राऊत, कृणाल कडव,सुनील हुकरे,   दिनेश धार्मिक आदींनी केली आहे .   Print


News - Bhandara | Posted : 2019-03-14


Related Photos