पिपरटोला येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / धानोरा :
धानोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरमोरी तालुक्यातील पिपरटोला येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज ३ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
प्रकाश तुळशिराम कुमोटी (३५) असे मृतक युवकाचे नाव आहे. प्रकाश हा विवाहित असून तो दारूच्या आहारी गेला होता. अशातच तो मागील काही दिवसांपासून वेड्यासारखा वागत होता. काल २ मार्च रोजी त्याची  पत्नी गडचिरोली येथील रूग्णालयात गेली होती. यावेळी तो घरी एकटाच होता. रात्रीच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-03


Related Photos