महत्वाच्या बातम्या

 गोंदिया शहराला उत्तर ते दक्षिण जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा जाहीर


- जनतेच्या आमदाराने जनतेला दिलेले वचन केले पूर्ण
- उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यास गती मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहराला उत्तर ते दक्षिण जोडणाऱ्या महत्वपूर्ण जुन्या रेलवे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य लवकरात लवकर करण्यात यावे, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्य अभियंता नंदनवार यांची भेट घेऊन गोंदिया चे जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नवीन उड्डाणपुलाचे कार्य सुरु झाले नसल्याने उड्डाणपुला विना शहरातील नागरिकांना होणाऱ्या असुविधेचा पाढा वाचला होता. सध्या गोंदिया शहरात उत्तर ते दक्षिण जाणे येणे साठी मुख्य उड्डाणपूल आणि अंडरपास चा पर्याय आहे. पावसाळ्यात अंडरपास बंद राहणार असून यामुळे मुख्य उड्डाणपूल व हड्डीटोली, रामनगर क्रोसिंग वर मोठ्या गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. अशा सर्व समस्या आमदार विनोद अग्रवाल यांनी बैठकीत मांडल्या यावर आमदार विनोद अग्रवाल यांना आश्वासन देण्यात आले होते, कि येत्या १० दिवसात नवीन उड्डाणपुलासाठी निविदा जाहीर करण्यात येईल. तसेच त्याला पूर्ण करून लवकरात लवकर निर्माण कार्य देखील सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने गोंदिया शहराला उत्तर ते दक्षिण जोडणाऱ्या रेलवे ओव्हरब्रिज साठी सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया द्वारा निविदा जाहीर करण्यात आल्या असून जनतेच्या आमदाराने जनतेला दिलेले वचन पूर्ण केले आहे.
४७ करोड ६१ लाख रुपयांमधून ४० फुट रुंद उड्डाणपूल जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ट्राफिक जाम च्या समस्यांपासून नागरिकांना सुटका मिळेल. आणि पुलावरून आवागमन करणे सोप्पे होईल. आता निविदा जाहीर झाल्या आहेत. मात्र त्याला पूर्ण करून पुलाचे निर्माण कार्य सुद्धा लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सोबतच पुलासाठी अतिरिक्त निधी ची आवश्यकता पडल्यास शासन स्तरावर पाठपुरावा करून वाढीव निधी ची मागणी करण्यात येईल. वेळोवेळी आढावा बैठक सुद्धा घेण्यात येईल ज्यामुळे निर्माण कार्यात येणारे अडथळे दूर करण्यास मदत होईल आणि येणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल.





  Print






News - Gondia




Related Photos