महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर तालुक्यात रेती तस्करीला उधाण : अवैध रेती वाहतूक, दोन ट्रॅक्टर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यात अवैध रेती तस्कर ला उधाण आले असून तालुका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
नाल्यातून अवैध रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरने वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करीत ट्रॅक्टर तहसील परिसरात जमा केला आहे. ही कारवाई १ जूनला रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गुरुनानक महाविद्यालय जवळ करण्यात आले.
मंडळ निरीक्षक एस. आर. चौधरी व तलाठी शंकर खरूले यांनी कारवाई करून एम.एच. ३४ / ए १०४३ व एम. एच.३४/ए ७५३७ या क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. तालुक्यात अवैध रेती तस्करीला उधाण आले असून त्याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुढे आली आहे. तालुक्यातील विसापूर येथे मागील महिन्यात रेतीसाठा जप्तीची कारवाई करीत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र तो अज्ञात इसम आजपर्यंत गवसला नाही. उलट जप्त केलेल्या साठ्यातून रेतीची चोरी होत असल्याचा प्रकार पुढे आला. विसापूर, नांदगाव पोडे, बामणी, कळमना, पळसगाव, दहेली व कोठारी नाल्यातून अवैध रेतीची चोरी बिनदिक्कतपणे मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. सदर प्रकार तहसील प्रशासनाला माहीत असूनही कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या बुडत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos