भाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /   देसाईगंज :
लाखांदूर रस्त्यावर भाजीच्या कॅरेटमधून वाहतूक होत असलेली दारू देसाईगंज पोलीस निरीक्षकांनी पकडली व त्यावर कारवाई केली. पोलीसांना लाखांदूर रस्त्यावरून दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळली. त्यांनी वाहन तपासणी करून दुचाकीवरून भाजीच्या कॅरेटमधून नेण्यात येत असलेली दारू पकडली. निरीक्षक सिद्धानंद मांडवकर व ए. पी. आय. गोरे यांच्या चमूने दारू पकडली.
जिल्ह्याच्या सिमेवरून वेगवेगळया पद्धतीने दारू जिल्ह्यात पाठवली जात आहे. खाजगी गाड्या, ट्रक, बसेस यानंतर आता भाजीच्या कॅरेटमध्ये भरून दारू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जात असल्याची घटना समोर आली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-09


Related Photos