महत्वाच्या बातम्या

 कोतवाल पदासाठी होणार फक्त लेखी परीक्षा


- 28 मे रोजी परीक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा तालुका अंतर्गत  कोतवाल पदभरतीचा जाहिरनामा 25 एप्रिल 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आला. या जाहिरनाम्यात नमुद लेखी परीक्षा गुण 75 व तोंडी परीक्षा गुण 25 असे न वाचता फक्त लेखी परीक्षा गुण 100 असे वाचावे. लेखी परीक्षा झाल्यास आता तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, कोतवाल पदभरती प्रक्रिया समिती रविंद्र राठोड यांनी कळविले आहे.

कोतवाल पदभरतीकरिता ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 24 मे 2023 असून पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 25 मे 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. 26 मे 2023 रोजी अंतिम यादी व प्रवेशपत्र प्रसिध्द, 28 मे 2023 रोजी परिक्षेचा दिनांक व 28 मे 2023 रोजी उत्तरपत्रिका तपासल्या नंतर लगेच उमेदवाराला मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.






  Print






News - Bhandara




Related Photos