महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरात चोरी : सोने व रोख रक्कम लंपास 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील मौलाना आझाद वार्ड येथे कुलूप तोडून अंदाजे साडे चार तोडे सोने व रोख रक्कम चोरी गेल्याची घटना घडली. 


गुलाब माणिकराव डाखोरे वय ६७ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड येथे राहत असून त्यांच्या आटा चक्की चा धंदा आहे. ते आपल्या मित्राचा मुलींचा लग्नाला नागपूर येथे ६ मे ला सहपरिवार गेले होते. ते ८ मे ला जेव्हा दुपारी घरी आले तेव्हा त्यांच्या दरवाजाच्या कुलूप तुटून दिसला. लागलीच ते घरात जाऊन बघितले असता दोन्ही आलमारीचे दार तोडून उघडे होते.


आलमारीत ठेवलेले नगद रोख ५०००/- रुपये व दागिने त्यात सोन्याची पोत, गोफ, अंगठी व कानातले बारी अंदाजे २,२५,००० किंमतीचे साडे चार तोडे व रोख रक्कम पाच हजार रुपये असे एकूण दोन लाख तीस हजार रुपये चोरी झाली आहेत. असे फिर्यादी गुलाब डाखोरे ने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos