अपर आयुक्तांनी घेतला राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा


- २९ पासून आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गचिरोली :
नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषिकेश मोडक यांनी आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा आज सोमवार २१ जानेवारी रोजी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.
गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर २९ ते ३१ जानेवारी पर्यंत आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये राज्यातील नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या चार विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या क्रीडा संमेलनात राज्यातील १ हजार ७५७ आदिवासी खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत. संमेलनाची जयत तयारी सुरू असून पहिल्यांदाच आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत होत आहेत.
क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागाचे अपर आयुक्त मोडक व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनात जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर क्रीडा स्पर्धेची तयारी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश  मोडक आज २१ जानेवारी रोजी गडचिरोली येथे आले होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आढावा सभा घेवून प्रत्यक्ष तयारी जाणून घेतली. सोबतच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्षन केले. सबंधित अधिकारी व कर्मचार्यांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या सुचना केल्या. राज्यस्तरीय क्रीडा संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांतर्गत सदस्यांना नेमून दिलेल्या कामाविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रेक्षागार मैदानावर आज सोमवारपासून नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरात गडचिरोली , चंद्रपूर, चिमूर, भंडारा, देवरी, नागपूर या आठ प्रकल्पातील ४२१ खेळाडूंचा समावेष आहे. या सराव शिबिराला अपर आयुक्त मोडक यांनी भेट दिली. मैदानाची तसेच निवास व्यवस्थेची पाहणी केली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-21


Related Photos