महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णांना पकडण्याकरीता जिल्हा प्रशासनाने राबविली शोधमोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, गडचिरोली आणि पोलीस प्रशासन तसेच दिव्यवंदना फाउंडेशन यांच्या सहकार्याने ०३ मे २०२३ रोजी गडचिरोली शहरातील रस्त्यांवर बेवारस भटकंती करत असलेल्या तसेच वाईट अवस्थेत वावरत असलेल्या मनोरुग्णांना पकडुन त्यांच्यावर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करन्याकरीता शोधमोहीम राबविण्यात आली. 

गडचिरोली शहरात बरेच मनोरुग्ण फिरताना दिसतात. सर्वसामान्य नागरीकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाच्यावतीने गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोड, मार्गावरील परिसर, आठवडी बाजार, गांधी चौक, बसस्टॉप परिसर, आरमोरी मार्ग, पंचायत समिती, लांजेडा, या ठिकाणी शोधमोहिम राबवून त्यांना पकडण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.बी. शुक्ल, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली सदस्य सचिव आर.आर. पाटिल यांच्या मार्गर्शनाखाली शोधमोहिम राबविण्यात आले. यावेळी अभियान टीम मध्ये विनोद पाटील, जिल्हा पारिविक्षा अधिकारी महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली, विधी स्वंसेविका तथा सामाजिक कार्यकर्ते अर्चना चुधरी, दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, सुषमा गलगले, काचन निकोरे, निलिमा धोडरे, प्रियंका पेटकर, सुप्रिया कंकलवार, लावण्या येलकुचेवार, आणि यांनी सदर मोहीम राबविली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos