राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करणार : मुख्यमंत्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. शहरी भागातही पट्टेवाटपाची प्रक्रीया सुरु आहे. पट्टयाची नोंदणी करुन दिल्यामुळे गरीब माणसाला त्याचा  हक्क मिळाला. जागेची नोंदणी करण्याबरोबरच कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब माणसाला पक्क घर देण्याचा ही शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.
 पुर्व नागपूरातीलनागपूर सुधार प्रन्यासच्या जागेबरील झोपडपट्टी वासीयांना मालकी हक्काचे पट्टेवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळेस अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार कृष्णाजी खोपडे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल, महानगरपालीका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यास सभापती शीतल तेली उगले  यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
 पट्टेवाटपाचा  कार्यक्रम हा ख-या अर्थाने सर्वांसाठी स्वप्नपुर्तीचा सोहळा असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी 55 झोपडपट्टीधारकांना प्रातिनीधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते पट्टेवाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासूनची  हक्काचा पट्टा मिळावा अशी मागणी होती. यापुर्वीच्या शासनाने  अनेकदा घोषणा केल्यात. मात्र गरीब लोकांना त्यांचा जागेचा पट्टा मिळाला नाही. असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.
जगाचा इतिहास पाहीला असता ज्यांच्या नावे जमीन होती अश्याच लोकांनी प्रगती केली. म्हणून गरीबांना स्वतच्या जमीनीचा मालकी पट्टा देण्याचा निर्णय या  शासनाने घेतला. राज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. शहरी भागातही पट्टेवाटपाची प्रक्रीया सुरु आहे. पट्टयाची नोंदणी करुन दिल्यामुळे गरीब माणसाला हक्क मिळाला. जागेची नोंदणीकरण्याबरोबरच कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब माणसाला पक्क घर देण्याचा ही शासनाचा प्रयत्न आहे. हा निर्णय घेतांना अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणीचा अभ्यास पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सुचना केल्यात व त्यांच्या सुचनेनुसार ही चांगला निर्णय करण्यात आला.
कमी पैश्यात घरे बांधुन देण्याचे तंत्रज्ञान केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी यांनी विकसीत केले. त्यानुसार नागपूरात 50 हजार घरे बांधण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
नागपूर शहर वेगाने विकसीत होत आहे. शहराचा सर्वागिण विकास होत असतांना स्वच्छता ही राखली पाहीजे. स्वच्छ सर्वेक्षणात लोकसहभाग वाढला पाहीजे अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली. शेवटच्या  पात्र माणसाला  त्याच्या हक्काचा पट्टा मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

यावेळी भांडेवाडी येथे महानगरपालीकेच्या जागेवर साचलेल्या कचऱ्याचे बायो-मायनिंग प्रकल्पाचे भुमीपुजन मुख्यमंत्री  देवेंन्द्र फडणवीस  यांच्या  हस्ते करण्यात आले.
   विकासाचे राजकारण करत रोजगार निर्मीतीवर भर दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतले. मिहानमध्ये 22 हजार तरुणांना रोजगार देण्यात आला. पट्टेवाटपाच्या ऐतीहासीक निर्णयाबद्दल श्री. गडकरींनी मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले. गरीब माणसाला स्वाभिमानाचा अधिकार या पट्टयांनी दिला. असेही ते म्हणाले. नागपूरात अनेक विकास कामे सूरु आहेत. त्या कामांचा आढावा त्यांनी मांडला.
 शहरात 35 हजार लोकांना पट्टेवाटप  करण्यात येत असून त्यांची नोंदणी सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले. उपराजधानीचे शहर म्हणून असणारे विशेष अनुदानाचे 380 कोटी रुपये महानगरपालीकेला विकासकामासाठी राज्यशासनाने उपलब्ध करुन दिले. येत्या मे महीन्यापर्यंत शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात येतील. त्यातुन 50 टक्के वीजबचत होईल असे ही पालकमंत्री म्हणाले.
 पुर्व नागपूरात नासुप्रच्या जागेवर 16 झोपडपट्टयातील 9 हजार 833 झोपडपट्टीधारकांना पटटे वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगीतले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-19


Related Photos