आजचे दिनविशेष


१८ जून महत्वाच्या घटना
१८१५ : वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.
१८३० : फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
१९०८ : फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
१९३० : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
१९४६ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
१९५६ : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९८१ : जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९८३ : अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.
२००९ : लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) - नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले.
२००६ : कझाकस्तान - देशाने पहिला उपग्रह KazSat-1 प्रक्षेपित केला.
१९७९ : दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) - अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.
१९५३ : इजिप्त हा देश प्रजासत्ताक बनला.
१८ जून जन्म
१८९९ : स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८५)
१९११ : पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)
१९३१ : प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)
१९४२ : दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म.
१९४२ : संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल मॅकार्टनी यांचा जन्म.
१९६५ : सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)
१९१६ : कोलंबियाचे २५वे राष्ट्राध्यक्ष ज्युलिओ सीझर टर्बे आयला यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर २००५)
१९१३ : ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचा जन्म (मृत्यू : १६ मे २००८)
१८८७ : भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्म (मृत्यू : ५ जुलै १९५७)
१८४५ : फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन यांचा जन्म (मृत्यू : १८ मे १९२२)
१८ जून मृत्यू
१८५८ : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)
१९०१ : मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३)
१९०२ : इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
१९३६ : रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १८६८)
१९५८ : इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)
१९६२ : पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.
१९७४ : स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)
१९९९ : साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.
२००३ : हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.
२००५ : भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)
२००९ : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)
२०२१ : भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख - पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधन (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)
२०२० : मेजर-जनरल - वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा लच्छमानसिंग लेहल यांचे निधन (जन्म: ९ जुलै १९२३)
२०१६ : सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु जेपियार यांचे निधन (जन्म: ११ जून १९३१)
२००५ : भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील संजय लोळ यांचे निधन (जन्म: १३ डिसेंबर १९४०)
१९३७ : फ्रान्स देशाचे १३वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी गस्टोन डॉमेरगून यांचे निधन (जन्म: १ ऑगस्ट १८६३)
१६७३ : फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका जीन मॅन्स यांचे निधन (जन्म: १२ नोव्हेंबर १६०६)
News - todayspecialdays




Petrol Price




