आयकर विभागाचे देशातील विविध शहरात अचानक ‘सर्च ऑपरेशन’ , बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  आयकर विभागाने  देशातील विविध शहरातील बड्या व्यापाऱ्याकडे अचानक   ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केल्याने व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आहे. नागपुरातही विभागाचे पथक पोहोल्याने, नागपूरकर व्यापाऱ्याची व्यावहारिक सारवासरव सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते.
आयकर विभागातर्फे बुधवारपासून मुंबई, अमरावती आणि नागपूरसह अन्य काही शहरांमध्ये आकस्मिक धाडसत्र सुरू झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या ‘सर्च ऑपरेशन’मुळे निश्चिंत असलेले व्यापारी सावध झाले आहेत. ज्यांच्या व्यवहाराचे धागेदोरे अन्य शहरांमध्येही आहेत, त्यांनी तात्काळ गाशा गुंडाळण्याचे संकेतही दिल्याचे सांगण्यात येते. या आकस्मिक धाडसत्राचे संयोजन विविध जिल्ह्यातील आयकर अधिकारी करत असून, एकूण २७ पथके उद्योजक, व्यापारी आणि बिल्डरांकडे कागदपत्रांची तपासणी करत आहेत. नागपुरात बिरामजी टाऊन येथेही एका व्यापाऱ्याच्या घरी हे पथक पोहोचल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, या पथकासोबत रायफलधारी पोलीसांचा बंदोबस्त देण्यात आला असून, ही संपूर्ण कारवाई ‘इन कॅमेरा’ केली जात आहे. प्रत्येक पथकात पाच अधिकाऱ्याचा समावेश असल्याचेही सांगण्यात येते.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-17


Related Photos