अपघातानंतर संतप्त जमावाने १५ हून अधिक ट्रक पेटविले, मृतकांची संख्या ८ वर


- कोट्यवधी रूपयांचे नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
एटापल्ली - आलापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत बसमधील ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विद्यार्थिनींचासुध्दा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने तब्बल १५ हून अधिक ट्रक पेटवून दिले आहेत. यामुळे घटनास्थळावर प्रचंड तणाव असून कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. 
ट्रक - बस अपघातात १० जण गंभीर जखमी झाले असून २९ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. एटापल्ली येथून जात असलेल्या अहेरी आगाराच्या बसला ट्रकने भिषण धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की अर्ध्याहून अधिक बस चिरडल्या गेली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरीक गोळा झाले. मार्गावरून जाणाऱ्या ट्रकांना पेटवून देण्यात आले. यामुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट उठले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos