आरमोरी नगर परिषद निवडणूक, छाणणीअंती नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १०४ अर्ज वैध


- १८ जानेवारीपर्यंत घेता येणार नामांकन मागे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / आरमोरी :
स्थानिक नवनिर्मित नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छूकांनी नामांकन दाखल केले होते. नगराध्यक्षपदासाठी विविध पक्ष तसेच अपक्ष अशा एकूण १० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. तर नगरसेवकपदासाठी १३९ उमेदवारांनी नामांकन केले होते. यापैकी छाणणीअंती नगराध्यक्षपदाचे २ तर नगरसेवक पदासाठी दाखल केलेले ३५ नामांकन अवैध ठरविण्यात आले आहेत.
आरमोरी नगर परिषदेची पहिलीच निवडणूक रंगतदार होणार असून संपूर्ण जिल्ह्यातील राजीकीय व्यक्तींचे निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. काॅंग्रेस, भाजपा, राकाॅ तसेच अन्य पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले. तर नाराज झालेल्या शिवसैनिकांनी वेगळी आघाडी निर्माण केली असून परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूकीत उडी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१० जानेवारी रोजी नामांकनांची छाणणी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदाचे ८ अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी १०४ अर्ज वैध ठरले आहेत. नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख १८ जानेवारी असून कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे संपूर्ण आरमोरीवासीयांचे लक्ष लागले आहे. यानंतर पुढील रणनिती ठरणार आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-14






Related Photos