महत्वाच्या बातम्या

 वीज कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : गडचिरोली - देसाईगंज - कुरखेडा या राष्ट्रीय मार्गावरिल दुग्ध डेअरी समोर पती, पत्नी व त्यांचे दोन चिमूकल्या मुलींवर विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतक देसाईगंज जवळील आमगाव येथील रहिवासी  असून भारत लक्ष्मण राजगडे वय ३७, पत्नी अंकिता भारत राजगडे वय ३०, मुलगी देव्यांशी भारत राजगडे वय ५ तर लहान मुलगी ३ वर्षाची आहे. मृतक पत्नी व दोन मुली मालेवाडा जवळील गडगडा या गावाला कार्यक्रमाकरिता गेले होते.

सायंकाळी आमगावला परत येताना वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस येत असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घेतले. तेवढ्यात वीज कोसळून चौघेही घटनास्थळीच ठार झाले.






  Print






News - Gadchiroli




Related Photos