गडचिरोली नगर परिषदेच्या ११ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची याचिका खारीज, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड


- नगरसेवकांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
स्थानिक नगर पालिकेच्या ११ नगरसेवकांवर विविध आरोप करून  नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज करून याचिकाकर्त्यांना  २० हजाराचा दंड ठोठावला असल्याची  माहिती नगरसेवकांनी आज ५ जानेवारी रोजी आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेला नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे,  पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, संजय मेश्राम, गुलाब मडावी, अ‍ॅड.उंदिरवाडे, केशव निंबोड, नगरसेविका लता लाटकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे ,  वैशाली नैताम,  भाजप पदाधिकारी देवाजी लाटकर, विलास नैताम   उपस्थित होते. नगरसेवक रमेश भुरसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विनय बांबोळे व मनोहर चलाख यांनी नगरपालिकेतील ११ नगरसेवकांवर विविध आरोप करून  जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व अपात्रतेत्री खोटी तक्रार ५ जुलै २०१८ रोजी दाखल केली होती.  बांबोळे व चलाख यांनी खोटी तक्रार दाखल करून नगरसेवकांची बदनामी व प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अर्जदारांनी कोणताही लेखी पुरावा  सादर न केल्याने जिल्हाधिकारी यांनी ११ नगरसेवकांविरोधातील याचिका  २८ डिसेंबर २०१८ रोजी खारीज केली आहे.  अर्जदार विनय बांबाळे व चलाख यांनी   अनर्हतेचे प्रकरण दाखल करतांना  योग्य पुरावे व कायदेशिर तरतूदीचा अभ्यास करून प्रकरण दाखल केले नाही. न्यायालयाचा बहुमुल्य वेळ तत्थहिन प्रकरणात वाया घालविल्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी यांनी दोन्ही अर्जदांराना २० हजाराचा दंड सुध्दा ठोठावला आहे. खोटी तक्रार दाखल करणार्यांना जिल्हादंडाधिकारी यांनी चांगला धडा शिकविला आहे. नगरसेवकांची बदनामी केल्याप्रकरणी विनय बांबोळे व चलाख यांच्या विरोधात न्यायालयात मानहाणीचा दावा  दाखल करण्यात येणार असल्याचे नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos