उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा यॊजनांचे ई - भूमीपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचा ई - भूमीपूजनांचा कार्यक्रम  ५ जानेवारी  रोजी सकाळी ११  वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री  ना. देवेंद्र फडणवीस ( महाराष्ट्र शासन ) यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री   ना. बबनराव लोणीकर ,  पाणी  पुरवठा व स्वच्छता ,कृषी पनन व फलोत्पादन राज्यमंत्री   ना. सदाभाऊ खोत उपस्थित राहतील. 
  गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील वडधा वाढीव पाणी पुरवठा योजना,धानोरा तालुक्यातील मिचगाव पाणी पुरवठा योजना व साखेरा पाणी पुरवठा योजना, चामोर्शी तालुक्यातील कळमगाव-एकोडी पाणी पुरवठा योजना व  कुनघाडा माल पाणी पुरवठा  योजना, तसेच एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली पाणी पुरवठा योजना, अहेरी तालुक्यातील महागाव बु.- महागाव खु. पाणी पुरवठा योजना व सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवपेठा पाणी  पुरवठा योजनाचा समावेश आहे. 
 प्रस्तावित ई- भुमिपुजनांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय माहिती केंद्र(NIC) मध्ये दृष्य स्वरुपात पाहता येईल. या कार्यक्रमास पालकमंत्री गडचिरोली  जिल्हा तथा राज्यमंत्री आदिवासी विकास विभाग, ना. अम्ब्रीशराव आत्राम , जिल्हा परिषद अध्यक्ष, योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी,   आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी, शेखर सिंह, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विजय राठोड, जि.प. गडचिरोली तसेच जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समिती सभापती/ उपसभापती, पंचायत समिती सदस्य, संबधीत गावाचे सरपंच / उपसरपंच  ई-भूमिपुजनाचे कार्यक्रमास उपस्थित राहणार  असल्याची माहिती   कार्यकारी अभियंता ( ग्रामिण पाणी पुरवठा ) जिल्हा परिषद , गडचिरोली यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-04


Related Photos