पोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिस दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून रेझिंग डे च्या माध्यमातून आठवडाभर लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
आज २  जानेवारी रोजी पोलिस संकुल परिसरात स्वच्छ भारत स्वच्छ पोलिस मोहिम राबवून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांप्रती आपलेपणाची जाणीव व्हावी व पोलिस दलाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र अंतर्गत शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली. तसोच पोलिस ठाण्यातील कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गडचिरोली शहरातून पथसंचलन करण्यात आले. यामध्ये बीडीडीएस पथक, सी - ६० पथक, श्वान पथक, बॅंड पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 
रेझींग डे निमित्त पोलिस दलातर्फे २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती, सायबर गुन्ह्यांविषयी माहिती, सायबर दिंडी, कॅरम स्पर्धा, व्यसनमुक्ती संकल्प, कृषी मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-02


Related Photos