महत्वाच्या बातम्या

 पांढरकवडा येथील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी व परिसर विकासासाठी पूर्ण शक्तीने सहकार्य करू : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


- वढा तीर्थक्षेत्राचे काम दर्जेदार व्हावे. 

- पांढरकवडा येथे श्रीराम, शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रापुर : पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानच्या परिसरात निर्माणाधीन असलेले श्रीराम आणि शिवमंदिर येत्या श्रीरामनवमीपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करावा, प्रभू श्री राममंदिराच्या विकासकामासाठी पूर्ण शक्तीने सहकार्य करू, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. 

पांढरकवडा येथे श्रीराम व शिव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री महानगर ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमो प्रदेश सचिव अनिल डोंगरे, राम मंदिर अध्यक्ष पवार, सरपंच सुरेश तोताडे, लक्ष्मण सादलावार, चिन्ना नलभोग, समीर भिवापुरे उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, श्रीराम सेतू निर्माणाच्या वेळी प्रभू श्रीरामांनी महादेवाची आराधना केले. अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या श्रीराम मंदिरासाठी नुकतेच चंद्रपुरातून सागवान काष्ठ रवाना झाले. ही बाब हा आनंद देणारी आहे. त्याच चंद्रपुर येथील पांढरकवडा येथे श्रीराम आणि महादेवाचे मंदिर होत आहे. ही आनंद द्विगुणीत करणारी बाब आहे. चंद्रपुर येथून अयोध्येत गेलेले सागवान काष्ठ मंदिराची सुमारे एक हजार वर्षापर्यंत शोभा वाढवेल, असे मुनगंटीवार यांनी अभिमानाने नमूद केले. 

तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार

पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानाचा परिसर क वर्ग तीर्थक्षेत्रात येतो. त्यामुळे येथे सुंदर उद्यान, भाविकांसाठी सभागृह, भक्तनिवास उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिले.

भूस्खलन पीडिताना मदत

घुग्घुस येथे काही महिन्यांपूर्वी भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामुळे अनेकांची घरे पडली होती. या घटनेतील पीडितांना दीड लाख रुपयांच्या मदत धनादेशाचेही सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शासन आणि आपण या परिवारांच्या पाठीशी आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

वढा विकास आराखडा

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होते. मागणीची दखल घेत मुनगंटीवार यांनी पांढरकवडा जवळच असलेल्या वढा तीर्थक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून वढा तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे.  वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. या आराखड्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळेल. या विकास आराखड्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos