महत्वाच्या बातम्या

 मोह फुले गोळा करण्यासाठी जंगलात आग लावू नका : लक्ष्मीकांत ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन


- बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची सध्या मोह फुल गोळा करण्यासाठी जंगलपरिसरात धावपळ सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांना रोजगार मिळत असून आर्थिक मदत होते. परंतु दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला मोह फुल गोळा करण्यासाठी अनेक नागरिकाकडून जंगलात आग लावण्यात येते. मोह फुल गोळा करण्यासाठी मोहाच्या झाडाखाली गडून पडलेली झाडांची पाने असतात त्यांना आग लावली की ती आग जंगलपरिसरात हळूहळू पसरत जाते. 

यानंतर परिसरात लागलेल्या आगीमुळे लहान रोपटे मरतात, सरपटणारे प्राणी, लहान कीटक यामध्ये संपूर्ण जळून जातात. प्रत्येक जीव जंतूचे पर्यावरणामध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाला साथ देण्याची आवश्यकता आहे.  बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी मोह फुल गोळा करण्यासाठी आग लावू नका असे जनजागृतीद्वारे तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.

२ एप्रिल रविवारीला कोरची तालुक्यातील नियत क्षेत्र फुलगोंदी कक्ष क्रमांक 468 मधील मोहफूल गोळा करण्यासाठी नागरिकांनी लावलेली आग संपूर्ण जंगलात पसरली होती, ही आग बेडगाव वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विझवण्यात आली. तसेच दोडके जंगल परिसरात व जिथे आग लागते आणि माहिती मिळते अशा ठिकाणी आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग लागली की सॅटॅलाइट throught रजिस्टर मोबाईल नंबर वर संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मेसेज येते त्यानंतर ती आग विझवल्या जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे यांनी सांगितले आहे.

जंगलात आग लावू नका यासाठी बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे, क्षेत्र सहाय्यक एस एन राठोड, बेतकाठी क्षेत्र सहाय्यक आर पी ठाकरे, डाबरी वनरक्षक बी एस अतकरे, बोरी वनरक्षक जी एम चुरगाये, बेतकाठी वनरक्षक एन आर मितलामी, मुंडीपार वनरक्षक व्ही एस कवडो, नवेझरी वनरक्षक पी एम मेंढे, फूलगोंदी वनरक्षक एम आर मेश्राम, बेळगाव वनरक्षक पी. बी. पेंदाम, मयालघाट वनरक्षक एम एल गोखे, दोडके वनरक्षक आर के हलामी, कालापाणी वनरक्षक पी एम मगरे, कोटरा वनरक्षक एल आर चौधरी, टेमली वनरक्षक व्हि जी रंदये, भिंपुर वनरक्षक एम बी कुंजाम व वनकर्मचाऱ्याकडून गावो - जावून जनजागृती केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos