पीएम-यशस्वी योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेतून देण्यात येणा-या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पीएम यशस्वी योजनेअंतर्गत टॉप क्लास एज्युकेशन वउ स्कुल फॉर ओबीसी, ईबीसी, डीएनटी स्टुडंट योजना ही भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेद्वारे इतर मागासवर्ग, आधिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जाती या समाजातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता ९ ते १२ वीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश या विद्यार्थ्यांमधील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणासाठी आधार देणे हा आहे. जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पीएम यशस्वी योजनेतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरीता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर भरण्यात यावे.
इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जाती या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासकीय मदतीतून भागविणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. लाभार्थी हा इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थी असावा. वार्षिक कुटुंबिय उत्पन्न कमाल २ लाख ५० हजार रुपये असावे. मागील वर्षातील गुणांच्या आधारे मेरीट यादीनुसार निवड पद्धत असणार आहे.
तसेच ज्या विद्याथ्यांनी सन २०२५-२०२६ मध्ये इयत्ता ९ वी किंवा ११ वी मध्ये असताना या योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांनी सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या अर्जाचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या तारखा (शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७) : १) ऑनलाईन अर्ज भरणे सुरू - ०१ जून २०२६ पासून, २) विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत - ३१ ऑक्टोबर २०२६, ३) शाळांकडून अर्ज पडताळणी - १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापुर्वी योजना लागु असल्याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यामार्फत करावी व अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर कडून आपला अर्ज ऑनलाईन पडताळला गेला आहे की नाही, याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




