महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ मार्च महत्वाच्या घटना

१८३९ : बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७ : न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८ : कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९ : बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.

१९३१ : भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

१९४० : संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

१९५६ : पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९८० : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

१९९८ : अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 

१९९९ : पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले.

१९९९ : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री आला. सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात

२००१ : रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

२३ मार्च जन्म

१६९९ : अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बाट्रॉम यांचा जन्म.

१७४९ : फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.  

१८८१ : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दुगार्ड यांचा जन्म.

१८८१ : नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.

१८८३ : कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू : ६ सप्टेंबर १९६३)

१८९३ : भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू : ४ जानेवारी १९७४)

१८९८ : आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू : २४ डिसेंबर १९७७)

१९१० : समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू : १२ ऑक्टोबर १९६७) 

१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

१९९६ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू : १ ऑगस्ट २००८)

१९२३ : क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू : २१ जानेवारी १९४३)

१९३१ : रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.

१९५३ : भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.

१९५४ : अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शनचे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.

१९७६ : भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म. ) १९८७ : अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

२३ मार्च मृत्यू

१९३१ : क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म : २८ सप्टेंबर १९०७)

१९३१ : क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म : १५ मे १९०७)

१९३१ : क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म : २४ ऑगस्ट १९०८)

१९९१ : व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म : ३१ मार्च १९१३)

२००७ : मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

२००८ : मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.

२०११ : ब्रिटिश- अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन. (जन्म : २७ फेब्रुवारी १९३२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos