खुटाळा जवळ २ दुचाकीचा अपघात, ६ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नेरी (चिमूर) :
नेरी - सिंदेवाही मार्गावरील खुटाळा जवळ आज   १२ डिसेंबर रोजी दुपारी  ३.३० वाजताच्या  सुमारास नेरीकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोर असणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. 
गुरुदास तुळशीराम गुरनुले रा, मेंढा (माल) सिंदेवाही हे पत्नी व दिड वर्षाच्या मुलीसह हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक एमएच ३४  डब्ल्यू  ६६९४ ने शिरपूर वरून  सिंदेवाहीला जात असताना पाठी मागून येणारा शुभम घनश्याम उराडे रा. समुद्रपूर यांच्या  ताब्यातील मोटरसायकल एमएच  ३२ एएम ३३१५  ने  समोर असणाऱ्या गुरुदास यांच्या मोटोरसायकलला खुटाळा ते मोटेगाव जाणाऱ्या मार्गावर धडक मारल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये समोरील वाहनवरील गुरुदास आणि त्यांची पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाले तर धडक मारलेल्या वाहनवरील शुभम याच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे.  परसराम सीताराम उराडे (७०) यांच्या  पायाला जखम तसेच सरस्वता परसराम उराडे (६५) हिच्या खांद्याला जबर मार लागला असून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-12


Related Photos