महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना (८ मार्च)

८ मार्च १८१७ : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

८ मार्च १९११ : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

८ मार्च १९४२ : दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

८ मार्च १९४८ : भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

८ मार्च १९४८ : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

८ मार्च १९५७ : घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

८ मार्च १९७४ : चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

८ मार्च १९७९ : फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

८ मार्च १९९३ : दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

८ मार्च २०१६ : पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

जन्म (८ मार्च)

८ मार्च १८६८ : कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)

८ मार्च १८७९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)

८ मार्च १८८६ : जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.

८ मार्च १९२१ : गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)

८ मार्च १९२८ : कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

८ मार्च १९३० : कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)

८ मार्च १९३१ : प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)

८ मार्च १९६३ : भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.

८ मार्च १९७४ : अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.

मृत्यू (८ मार्च)

८ मार्च १७०२ : इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)

८ मार्च १९४२ : क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

८ मार्च १९५७ : स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)

८ मार्च १९८८ : भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos