‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान !


- मिळताजुळता फॉर्म्युला शोधल्याचा आयआयटी  कानपूरच्या संशोधकांचा  दावा  
वृत्तसंस्था / कानपुर :
  अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात  गायब होण्याचा अजबगजब फॉर्म्युला वापरण्यात आला होता. त्या फॉर्म्युल्याशी मिळताजुळता फॉर्म्युला शोधल्याचा दावा आता आयआयटी, कानपूरच्या संशोधकांनी केला आहे. असाच  फॉर्म्युला जर जवानांनी वापरला तर ते चक्क गायब होऊन शत्रूच्या गोटात शिरतील आणि त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करतील. 
देशातील जवानांसाठी काही तरी करून दाखवायचे हे आयआयटी, कानपूरच्या संशोधकांचे स्वप्न होते ते मिस्टर इंडिया फॉर्म्युल्याच्या रूपाने साकार झाले आहे. जवानांना गायब करणारे मेटा मटेरियल तयार करण्यात आले आहे. या मेटा मटेरियलची चाचणी लवकरच होणार आहे. यासंदर्भात प्रयोगशाळेतील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
विशिष्ट मटेरियल जवानांनी वापरले तर फक्त जवानच नाही तर त्यांचे रणगाडे, शस्त्रास्त्रही गायब होतील. जवानांचे लढाऊ विमान हे शत्रूच्या रडारपासून आणि गुप्तहेरांच्या कॅमेऱ्यापासूनही अदृश्य होईल. शत्रूच्या घरात घुसून त्याला मारणे, सर्जिकल स्ट्राइक करणे यामध्ये हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांचे जवान तरबेज आहेत. वाळवंटात आणि बर्फाळ प्रदेशातही जवान कठीण परिस्थितीत शत्रूशी लढत आहेत. मात्र लष्करी कारवायांमध्ये जवानांच्या संरक्षण सामग्रीचे मोठे नुकसान होते ते कमी करण्यासाठीच आयआयटी कानपूरने अद्भुत संशोधन केले आहे, अशी , माहिती आयआयटी कानपूर चे संशोधक  डॉ. एस. अनंत रामकृष्ण यांनी दिली आहे.   Print


News - World | Posted : 2018-12-04


Related Photos