महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना (२१ फेब्रुवारी)

२१ फेब्रुवारी १८४२ : जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

२१ फेब्रुवारी १८४८ : कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.

२१ फेब्रुवारी १८७८ : न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

२१ फेब्रुवारी १९१५ : लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

२१ फेब्रुवारी १९२५ : द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

२१ फेब्रुवारी १९७२ : सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.

२१ फेब्रुवारी १९७५ : जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.

२१ फेब्रुवारी २०१३ : हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.

जन्म (२१ फेब्रुवारी)

२१ फेब्रुवारी १८७५ : १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)

२१ फेब्रुवारी १८९४ : वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९५५)

२१ फेब्रुवारी १८९६ : हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)

२१ फेब्रुवारी १९११ : अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)

२१ फेब्रुवारी १९४२ : अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)

२१ फेब्रुवारी १९४३ : ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.

२१ फेब्रुवारी १९७० : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.

मृत्यू (२१ फेब्रुवारी)

२१ फेब्रुवारी १८२९ : कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)

२१ फेब्रुवारी १९६५ : कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)

२१ फेब्रुवारी १९७५ : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)

२१ फेब्रुवारी १९७७ : साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९०३)

२१ फेब्रुवारी १९९१ : चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९३६)

२१ फेब्रुवारी १९९८ : चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९१९)

२१ फेब्रुवारी २०११ : अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos