महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१६ फेब्रुवारी)

१६ फेब्रुवारी १६५९ : पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

१६ फेब्रुवारी १७०४ : औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.

१६ फेब्रुवारी १९१८ : लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१६ फेब्रुवारी १९५९ : फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.

१६ फेब्रुवारी १९६० : अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

१६ फेब्रुवारी १९८५ : लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.

जन्म (१६ फेब्रुवार)

१६ फेब्रुवारी १२२२ : जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १२८२)

१६ फेब्रुवारी १८२२ : बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

१६ फेब्रुवारी १८७६ : भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९६६)

१६ फेब्रुवारी १०२९ : मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९९८)

१६ फेब्रुवारी १९५४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.

१६ फेब्रुवारी १९६४ : ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.

१६ फेब्रुवारी १९७८ : भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.

मृत्यू (१६ फेब्रुवारी)

१६ फेब्रुवारी १९४४ : भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

१६ फेब्रुवारी १९५६ : खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३)

१६ फेब्रुवारी १९६८ : कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)

१६ फेब्रुवारी १९९४ : जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै१९१२)

१६ फेब्रुवारी १९९६ : उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.

१६ फेब्रुवारी २००० : सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.

१६ फेब्रुवारी २००१ : मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos