महत्वाच्या बातम्या

   अहेरी विधानसभा क्षेत्रातील भागात बससेवा सुरू करण्यात यावी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार 


- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली, मुलचेरा भामरागड, सिरोंचा, अहेरी या तालुक्यातील काही ग्रामीण भागात अद्याप बस सेवा सुरु नसून येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला त्रास सहन करावे लागत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील काही ग्रामीण भागात बस सेवा सुरु नसून ग्रामीण भागतील शालेय विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

कोणत्याही कामानिमित्त कुठेही बाहेर गावी जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकाना पायी चालत किंवा खाजगी ट्रॅक्सीने जावे लागत आहे. हि बाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात येताच राज्य परिवहन महामंडळ अहेरीचे आगार प्रमुख राठोड यांच्याशी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावा गावात बस सेवा सुरळीत करण्यात यावी या करिता चर्चा करण्यात आली. यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आदि उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos