महत्वाच्या बातम्या

 ४२ कि.मी. रस्त्याची दर्जोन्नती करण्याकरिता ३ हजार २१७.१७ लक्षाची प्रशासकीय मान्यता : खासदार रामदास तडस 


- जिल्हयाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातुन रस्त्याची निवड.

- ग्राम विकास विभागाचा शासन आदेश निर्गमीत

- एकुण ४२ किमी मार्गांची होणार दर्जोन्नती.

-  ग्रामीण भागातील १४ ग्रामीण रस्ते विकास कामांना मंजूरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र. २, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वर्धा जिल्हयातील एकुण १४ विविध ४२ कि.मी. ग्रामीण रस्ते विकास कामांना अंदाजित किंमत रु. ३ हजार २१७.१७ लक्ष किमतीच्या प्रकल्पांना उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड करुन ग्राम विकास विभाग तर्फे मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी दिले. या बाबत सविस्तर शासन आदेश प्रशासकीय मान्यतेसह निर्गमीत करण्यात आले.

वर्धा जिल्हयातील एकुण ४२ किमी लांबीच्या १४ विविध रस्ते विकास कामांमध्ये आष्टी तालुक्यातील रामा- २९२ (जोलवाडी) तं अंबीकापूर रस्ता कि.मी १.५०० रु. ११६.११ लक्ष व  मलकापूर पंचाळा ते बोरगांव (टु) रस्ता किमी ६.१२० रु. ४६१.५१ लक्ष कारंजा तालुक्यातील रामा- २२३ (राहाटी) ते धानोली रस्ता कि.मी. ६.२०० रु. ४८५.५१ लक्ष, देवळी तालुक्यातील रामा २९५ ते बाभूळगांव बोबडे रस्ता किमी १.०१० रु. ६१.१० लक्ष, गिरोली ते भोजनखेडा रस्ता किमी १.५५५ रु. १०१.९० लक्ष, राममा-३४७ ते लक्ष्मीनारायणपुर रस्ता किमी १.८३० रु. १४१.११ लक्ष, टीआर- ०६ ते फत्तेपूर रस्ता किमी १.७५० रु. १३५.२५ लक्ष, रामा- २९५ विजयगोपाल ते सोनोरा रस्ता किमी १.००० रु. ७०.५३ लक्ष, वर्धा तालुक्यातील राममा- २६१ (सेलसुरा) ते प्रजिमा-१० रोठा रस्ता किमी १.४०० रु. १०५.५४ लक्ष, दहेगांव (मी) ते केळापूर रस्ता किमी १.००० रु. ७३.०२ लक्ष, इजिमा- ७५ ते करंजी काजी गावाला जोडणारा रस्ता किमी २.७७० रु. २१९.२४ लक्ष, समुद्रपूर तालुक्यातील रामा- ३२६ ते बोथोली रस्तो (हिवरा ते परधी बेडा) रस्ता किमी १.००० रु. ७०.४७ लक्ष, रामा- ३२६ ते सायगवान रस्ता किमी ८.७८० रु. ६९५.१८ लक्ष, हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ते गंगापूर रस्ता किमी ६.०५० रु. ४८०.०५ लक्ष, असे एकुण  ३ हजार २१७.४२ लक्ष रुपये किमंतीच्या ४१.९६५ कि.मी. चे रस्ते विकास कामांचा समावेश आहे.

महाआघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन एकही कामे मंजुर झालेली नव्हती त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबीत होती, परंतु महाआघाडी सरकार केल्यानंतर युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा देवेन्द्र फडणवीस यांनी ग्रामीण भागातील या रस्त्यांना गती देण्याकरिता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र. २ सुरु करुन अनेक ग्रामीण रस्त्यांना मंजुरी दिली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याचा विकास होईल. जिल्हयाचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीच्या माध्यमातुन सदर रस्त्याची निवड करण्यात आली. आज प्रशासकीय मान्यता झालेले सर्व रस्ते ग्रामीण विकास विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या संयुक्त विद्यमातुन पुर्ण होणार आहे, येत्या काळात लवकरच आनखी मोठया प्रमाणात मुख्यमंत्री ग्राम सडक याजनेतुन कामे मार्गी लागतील असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त करुन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा  वर्धा जिल्हा पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रति आभार व्यक्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos