महत्वाच्या बातम्या

 माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन


- अहेरी तालुक्यातील खांदला (राजाराम) येथे आयोजन 

- खेळांप्रमाणे सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा : राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील राजाराम-खांदला येथे व्हाॅलीबाॅल सामन्याचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना अहेरी ऊपविभागात पुर्वी मोजक्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या परंतू आता सर्वच खेळांचे स्पर्धा होत असतांना दिसत आहेत ते सुध्दा सर्वच दुर्गम भागात सुरु आहेत ही आनंदाची बाब आहे. आपल्या भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असल्याने अश्या स्पर्धा झाल्यास खेळाडूंना पोषक वातावरण मिळेल असे प्रतीपादन केले.

पुढे बोलतांना क्रिडा ही मानवी जिवनात आवश्यक बाब असते अशा स्पर्धांचे आयोजन करतांना गावकर्‍यांची एकजूटसुध्दा दिसते. सुशिक्षीत युवकांनी खेळांप्रमाणे गावाच्या विकासासाठी सुध्दा एकजुटीने पुढाकार घेतल्यास गावाचा नक्कीच सर्वांगीन विकास होऊ शकतो असे ते बोलले.

यावेळेस कार्यक्रमाला युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, सौ. सुमनताई आलाम सरपंचा ग्रामपंचायत खांदला, रवणी गावडे सदस्या, रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, संतोष मद्दीवार भाजपा महामंत्री, पोशालू सुदरी भाजपा महामंत्री, मुलचंद गावडे, सुरेश मोतकुरवार इत्यादी मान्यवर ऊपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos