महत्वाच्या बातम्या

 जिल्हा सनियंत्रण समितीची कोरची तालुक्यातील शाळांना भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : डॉ. विनीत मत्ते, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती वैशाली येगलोपवार, अधिव्याख्याता, पुनीत मातकर, अधिव्याख्याता, डॉ. विजयकुमार रामटेके, जिल्हा फुलोरा समन्वयक तथा विषय सहाय्यक या जिल्हा सनियंत्रण समितीने कोरची तालुक्यातील 24 जानेवारी 2023 ला शाळांना भेटी दिल्या. भेटीमध्ये जिल्ह्यात सुरू असलेले उपक्रम व त्यांची कार्यवाही कोणत्या पद्धतीने होत आहे हे जाणून घेतले व आवश्यक ते मार्गदर्शन केले आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

सर्वप्रथम श्रीराम विद्यालय कोरची  शाळेला भेट देऊन तपासणी करण्यात आली. शालेय सर्व भौतिक सुविधा पाहण्यात आल्या .शालेय पोषण आहार संपूर्ण दस्तऐवज, धान्य कोटी पाहणी करून सुव्यवस्थित असल्याची खात्री करून घेण्यात आली. शाळेतील शिक्षकांच्या अध्ययन अध्यापनाचे निरीक्षण करण्यात आले. शासन स्तरावरून सुरू असलेल्या उपक्रमाविषयी शिक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. NAS, असर सर्वेक्षण, निपुण भारत, स्कूल हेल्थ प्रोग्राम, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, वार्षिक नियोजन या विविध घटकावरती मार्गदर्शन करण्यात आले. सर्वच शिक्षक वृंदांनी सीपीडी कार्यक्रम करून अद्यावत राहावे असे निर्देश देण्यात आले. तद्नंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभळीला भेट देऊन शाळेतील फुलोरा मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम जाणून घेतला. शाळेत बालभवनाच्या साहित्याद्वारे अध्यापन सुरू असल्याची खात्री केली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे साध्या शब्दांचे वाचन, इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांचे शब्दांचे वाचन व वजाबाकी, इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचे पाढे घेतले. एका दृष्टिक्षेपात चाचणीचा प्रपत्र भरतांना वर्गणीहाय भरावा, CWSN विद्यार्थी असल्याची खात्री करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, 

शाळा प्रारंभिक मुक्त करावी असे निर्देश देण्यात आले. शेवटी गटसाधन केंद्र कोरची येथे भेट देऊन विषय साधन व्यक्ती यांचे कार्य, शाळा भेटी, फुलोरा मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमाचा अहवाल, गुणवत्तेमध्ये मागे असलेल्या शाळा, अजूनही बालभवन अद्यावत नसलेल्या शाळा इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विषय साधन व्यक्ती व विशेष शिक्षक यांनी कामाचे नियोजन करून शाळा भेटी व इतर विविध उपक्रम व्यवस्थितपणे राबवून त्याचा आढावा सादर करण्याचे निर्देश दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos