महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना

२८ जानेवारी १६६४ : मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

२८  जानेवारी १९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

२८ जानेवारी १९६१ : एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

२८  जानेवारी १९७७ : मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२८  जानेवारी १९८६ : चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

२८ जानेवारी २०१० : १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

जन्म

२८  जानेवारी १४५७ : इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू : २१ एप्रिल १५०९)

२८  जानेवारी १८६५ : स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२८)

२८  जानेवारी १८९९ : स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू : १५ मे १९९३)

२८  जानेवारी१९२५ : शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू : २३ सप्टेंबर २००४)

२८  जानेवारी१९३० : मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.

२८  जानेवारी१९३७ : चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

२८  जानेवारी १९५५ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.

मृत्यू

२८  जानेवारी १५४७ : इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन. (जन्म : २८ जून १४९१)

२८  जानेवारी १६१६ : संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म : २४ सप्टेंबर १५५१)

२८ जानेवारी १८५१ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म : १० जानेवारी १७७५)

२८  जानेवारी१९८४ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म : २ नोव्हेंबर १८९७)

२८  जानेवारी १९९६ : अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म : २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

२८  जानेवारी १९९७ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म : २७ जुलै १९११)

२८ जानेवारी २००७ : संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म : १६ जानेवारी १९२६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos