महत्वाच्या बातम्या

 नमाद महाविद्यालय आणि एस. एस. जयस्वाल महाविद्यालयात रंगला मुलींच्या कबड्डीचा अंतिम सामना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत गोंदिया झोन अंतर्गत गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया आणि एस. एस. जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्यात रंगला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एस. एस. जयस्वाल महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत मुलींचा कबड्डीचा संघ निवडायचा आहे. त्यासाठी जिल्ह्यानुसार झोन तयार करून झोन स्तरावर मुलींची कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाने गोंदिया झोनची जबाबदारी गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयावर सोपविली. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाद महाविद्यालयात १० ऑक्टोबर पासून झोन स्तरीय मुलींची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेकरिता ११ संघानी नाव नोंदणी केली. परंतु प्रत्यक्ष ९ संघ सहभागी झालेत. यात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया, जगत महाविद्यालय गोरेगाव, राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी, एस एस जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव, एम बी पटेल महाविद्यालय सालेकसा, एस अग्रवाल महाविद्यालय सालेकसा, एस चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव, एस.एस गर्ल्स कॉलेज गोंदिया इत्यादी महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
गोंदिया झोन स्तरावरील अंतिम सामना नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया आणि एस एस जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्यात झाला. मुलींच्या दोन्ही संघानी आपले कौशल्य पणाला लावून खेळ केला. अतिशय रंगतदार झालेल्या सामन्यात एस एस जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगावच्या संघाने बाजी मारून विजयश्री संपादन केला. पंच म्हणून पंकज बोरकर, देवेंद्र आहके, जितेंद्र यांनी काम पहिले. विजेत्या व उपविजेत्या संघाला नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. महाजन यांनी विजेत्या व उपविजेत्या संघाचे अभिनंदन करून विजेत्या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एस एस जयस्वाल महाविद्यालयाचे डॉ. अश्विन चंदेल, आयोजन समितीचे डॉ. योगराज बैस, डॉ. परवीन कुमार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नमाद महाविद्यालयाचे डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. अर्चना जैन, डॉ. भावेश जसानी, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. सुनील जाधव, डॉ. संतोष होतंचंदानी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. उमेश उदापुरे, प्रा. योगेश भोयर, टोपेश सावरकर, अभय वाघाडे, आयुषी मुरकुटे सोबतच नमाद महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos