आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव : हैदराबादच्या टी नटराजनला झाली लागण, संपर्कातील सहा जण विलगीकरणात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मोठ्या अंतरानंतर यूएईमध्ये सुरु झालेल्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल मॅनेजमेंटच्या चिंता वाढल्या आहेत. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ६ खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सामना खेळला जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आरटी-पीसीआर चाचणीमध्ये हा निकाल आला आहे जो सामना सुरू होण्यापूर्वी केला जातो. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि कर्मचारी यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ज्या सदस्यांना वेगळे करण्यात आले आहे त्यात विजय शंकर (खेळाडू), विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फिजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), गणेशन ( गोलंदाज) यांचा समावेश आहे.
आयपीएलच्या या हंगामाच्या सुरुवातीलाही कोरोनाचे प्रकरणे समोर आल्यानंतर भारतात सुरु असलेली आयपीएल काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयपीएल पुन्हा सुरू करण्यात आले. आता दोन दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचे प्रकरण समोर आले आहे.  Print


News - World | Posted : 2021-09-22
Related Photos