महत्वाच्या बातम्या

 भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने आंतरजातीय विवाह संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : श्री सार्वजनिक वैनगंगा चुलबद संगम शिवमंदिर देवस्थान सोनी संगम विचारमंच येथे भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने वर चि. रुपचंद दिगांबर बेदरे मु. नैनपूर पो. वडसा ता. देसाईगंज जि. गडचिरोली वधू चि. सौ. का. स्नेहा रविंद्र कोल्हे मु. अरत्तोंडी पो. कोकडी ता. देसाईगंज जि. गडचिरोली या दोन प्रेमी युगलांचा आंतरजातीय विवाह प्रसंगी उपस्थित समितीचे पद अधिकारी व इतर मंडळी, मंडळीचे समक्ष हिंदू विवाह पद्धती प्रमाणे विवाह संस्कार विधी कार्यक्रम पार पाडण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित शिव मंदिर देवस्थान अध्यक्ष अविनाश कुथे व भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाचे अध्यक्ष योगेश नेवारे, मच्छिन्द्र मुळे, घनश्याम कोकोडे, जितेंद्र गेडाम, दिनकर सहारे, दिवाकर भुते, केशव मुळे, ज्ञानेश्वर कवासे,  सुशांत दाणे, अरुण कुथे व इतरही सर्व पद अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos