जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, चंद्रपूरच्या वतीने क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आदिवासी समाजाच्या हक्क, सन्मान, समानता आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
निसर्गाशी असलेले नाते जपत समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, जिल्हा महिला शहर अध्यक्ष बेबी उईके, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील आलाम, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर, तालुका सचिव सुरेश किन्नाके, तालुका कोषाध्यक्ष बालगोविंद मेश्राम, सचिन फुलझेले (धाबा), जोगी नैताम, वैशाली चांदेकर, शोभा घरडे, रितिक उईके यांच्यासह परिषदचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




