शाळेच्या वसतिगृहात विधीसंघर्ष बालकावर अनैसर्गिक कृत्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील एका शाळेच्या वसतिगृहात दोन १० वर्षीय विधीसंघर्ष बालकांनी अन्य दोन दहा वर्षीय विधीसंघर्ष बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. मात्र, पीडित बालकांपैकी एका बालकाला शारीरिक त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालक आपल्या आजी व शिक्षकांसोबत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान घडलेल्या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून आवश्यक कारवाई सुरू केली आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती, तसेच वसतिगृहातील देखरेख आणि सुरक्षेबाबतही तपास केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




