महत्वाच्या बातम्या

 राजुरा पोलिसांची कारवाई : बोलेरोतून १०.१० लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत अवैधरीत्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपी अर्जुन दयाशंकर तिवारी २८ वर्ष, रा. कोठारी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्रं. एमएच-३४-बीजी-७०९४ मधून विविध प्रकारच्या प्रतिबंधित हुक्का-शिशा तंबाखू, पान मसाला व सुपारीसह १० लाख १० हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार जोगापूर फाटा येथे सापळा रचून संशयित बोलेरो पिकअप वाहनाची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान वाहनाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये होला हुक्का-शिशा तंबाखू, ईगल हुक्का-शिशा तंबाखू, क्रेझ तंबाखू, व्ही-१ तंबाखू, महक चैनी प्रीमियम फिल्टर तंबाखू, केसरयुक्त विमल पान मसाला तसेच आरईएक्स गोल्ड सुपारी या विविध ब्रँडच्या तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत २ लाख १० हजार ९२२ रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ८ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन देखील जप्त करण्यात आले. असे एकूण १० लाख १० हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सहाय्यक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार रामेश्वर चहारे, विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोलीस अंमलदार महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, राजीव दुबे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos