अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस ०३ वर्षे कारावास व १०,००० हजार रुपये दंडाची शिक्षा


- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली अनिरुध्द टिकले यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सविस्तर वृत्त असे आहे की, ३०/०८/२०२३ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीत आरोपी नामे मंगेश मोहन दुमाणे, २२ वर्षे रा. ताडूरवार नगर आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली याने पिडीत बालिका ही घरी एकटी असल्याचे पाहुन पिडीतेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. याअनुषंगाने पिडीतेच्या आईच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे आरमोरी येथे अप क्र. ३०३/२०२३ , ३०/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोस्टे आरमोरी पोलीसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नामे मंगेश मोहन दुमाणे, २२ वर्षे रा. ताडूरवार नगर आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली यास ३०/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली साहील झरकर यांनी सदर प्रकरणाचे तपास पुर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ८७/२०२३ नुसार खटला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे खटला चालवण्यात आला होता.
पिडीता, फिर्यादी, पंच व साक्षीदाराचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राह्र धरून ३१/०७/२०२६ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली अनिरुध्द टिकले यांनी आरोपी नामे मंगेश मोहन दुमाणे २२ वर्षे, रा. ताडुरवार नगर आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली यास कलम ३५४ भादवि, कलम ३(१) (W)( i)(ii), कलम ३(२)(va) अजाजका मध्ये दोषी ठरवून ०३ वर्ष कारावास व १०,००० रुपय दंडाची शिक्षा ठोवावली आहे. तसेच दंड न भरल्यास ०६ महिने वाढीव साध्या कारावासाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.
सरकार तर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली साहील झरकर यांनी केला व संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
News - Gadchiroli




Petrol Price




