वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली विधान परिषद निवडणूक, अरुण लखाणींचा उमेदवारी अर्ज दाखल : डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ अंतर्गत वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार अरुणजी लखाणी यांनी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज उत्साहपूर्ण वातावरणात दाखल केला. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास राज्य मंत्री तथा निवडणूक प्रमुख मा. पंकजजी भोयर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके, माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहीर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया, आमदार देवरावजी भोंगळे,आमदार करणजी देवतळे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,आमदार किशोरजी जोरगेवार, माजी खासदार रामदासजी तडस, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, आमदार समिर कुणावार, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिश भैय्या शर्मा, भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष संजयजी गाते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतमधील महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी अरुणजी लखाणी यांना शुभेच्छा देत वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला लाभेल आणि महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या १८ जून २०२६ रोजी होत असून या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अरुणजी लखाणी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय संपादन करण्याचा निर्धार माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




