मत्स्यव्यवसाय वाढीसाठी कृषि विस्तार कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील मत्स्य- शेतकरी आणि पारंपारिक मच्छीमारांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच आधुनिक मत्स्यतंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून आत्मा योजनेंतर्गत कृषि विस्तार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मस्त्सव्यवसाय शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांतर्गत कृषि विस्तार सुधारणांसाठी आंतरजिल्हा शैक्षणिक सहल, जिल्हाअंतर्गत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व शेततळ्यात मत्स्यसंवर्धन प्रात्याक्षिक योजना राबविण्यात येणार आहे. या शैक्षणिक सहल प्रशिक्षणातून मत्स्यव्यसाय शेतक-यांना बायोफ्लॉक तंत्रज्ञान, मत्स्यखाद्य निर्मिती आणि मत्स्यबीज निर्मिती केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी मिळेल व गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, आधुनिक साधने आणि बाजारपेठ व्यवस्थापनाचे एक दिवसाचे मोफत प्रशिक्षण तसेच शेततळ्यात मत्स्यसंवर्धन प्रात्याक्षिक कार्यक्रम शेततळ्यासाठी केवळ सिंचनासाठी वापर न करता मत्स्यपालनाचा जोडधंदा सुरु करुन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे.
शैक्षणिक सहल व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान ४ थी पास असणे आवश्यक आहे. मत्स्यव्यसाय सहकारी संस्थेचे सभासद, मत्स्य शेतकरी किंवा मत्स्यसखी असणे आवश्यक आहे. शेततळे प्रात्याक्षिकाकरीता वैयक्तिक किंवा सामुहिक मालकीचे ०.१० ते १.०० हेक्टर आकाराचे शेततळे असावे आणि त्यात किमान ९ ते १० महिने पाणी असणे बंधनकारक आहे.
ही योजना संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील बिगर आदिवासी व आदिवासी भागात राबविली जाणार असून नोंदणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील ०७१५२ - २४३८०२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




